नाशिक दिनकर गायकवाड शैक्षणिक विद्यार्थ्यांना कार्याबरोबर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कवी किशोर बळी यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील अकोला, राजारामनगर येथील बी. के. कावळे विद्यालयात कवी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत अकोला येथील हास्यकवी किशोर बळी यांचा 'संस्कारक्षम वय आणि संस्कार' यावर विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी कवी लक्ष्मण महाडिक होते.
यावेळी कवी किशोर बळी यांचे स्वागत श्रीमती टी. पी. कावळे यांनी केले. यावेळी ग्रामीण कवी संदीप जगताप, प्रा. रतन आवारे, कॉलेज प्राचार्य गवळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केले. यावेळी प्रा. संदीप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले, तर आपल्या विदर्भ बोलीतून अनेक दाखले देत कवी किशोर बळी यांनी संस्कार व विद्यार्थी जीवन याचे महत्त्व प्रतिपादन केले. कवी लक्ष्मण महाडिक यांनी 'जपून टाक पाऊल लेकी' ही कविता सादर केली.यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
