श्रीरामपूर दिपक कदम येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्या वतीने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीच्या वतीने मा. नगरसेवक ताराचंद रणदिवे, यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ताराचंद रणदिवे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे म्हणाले की रणदिवेंनी केलेल्या चांगल्या कार्याची दखल मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली आहे. रणदिवे यांचे समाजाभिमुख कार्य असल्याने हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
कार्येक्रमासाठी आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते एकत्र असल्याचे दिसून आले.यावेळी रिपाई नेते राजू कापसे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे,मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे,
राष्ट्रवादी अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष दीपक कदम, बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुगंधराव इंगळे, पीआरपीचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, राजू नाना गायकवाड, संजय बोरगे,रवींद्र लोंढे, राष्ट्रवादीचे युवा नेते रवींद्र हरार, दादासाहेब बनकर, रियाज खान पठाण, सुमेध पडवळ, आदि आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मांनले