नाशिक दिनकर गायकवाड नाशकातील पंचवटी विभागात युवासेनेचे जिल्हाप्रमुख रूपेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच परिसरातील महिलांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गाने सहभाग घेत कार्यक्रमास प्रतिसाद दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतूनराज्यात छत्री वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार रविवारी युवासेनेचे जिल्हाप्रमुख पालकर यांनी पंचवटी विभागात छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सामाजिक बांधिलकी जपत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी युवासेनेकडून उपक्रम घेतले जात आहेत. शिवाय, तरुणांसाठी वेळोवेळी युवासेना लढत राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख रूपेश पालकर यांनी म्हटले. या कार्यक्रमास युवासेना पदाधिकारी तसेच बालाजी मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बालाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेश पालकर, युवासेना पूर्व विधानसभा प्रमुख कुणाल भवर, अमित एरंडे, विजय मेढे, आनंद वर्दे, नीलेश पालकर, सुमित बोंदार्डे, तुषार टेकावडे, विकी पालकर, बापू इंगळे,संदीप कापसे, विकी भरीतकर आदींची उपस्थिती होती.