नाशिक दिनकर गायकवाड गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून आणि क्रिशा फाऊंडेशन यांच्या विद्यमाने दिंडोरी येथे महिला उद्योजिका प्रशिक्षण मेळावा मातोश्री कृषी पर्यटन, निळवंडी रोड, दिंडोरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
उद्योजिका प्रशिक्षण मेळाव्यात 'महिला सक्षमीकरण' या विषयावर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आयोजित केले आहे. यावेळी मशरूम, समई आणि फुलवाती, मसाले, सेंद्रीय खते आणि औषधे, ड्रोन ऑपरेट करणे या प्रशिक्षणासोबत कच्चा माल पुरवून तयार मालाची हमीभावाने खरेदीदेखील केली जाणार आहे. महिलांना कुठेही मार्केट शोधण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी निता भामरे, अरुणा देशमुख, संध्या निरगुडे, मंदा गायकवाड, आशा कराटे,आरती पवार, भारती देशमुख, नीलम महाले, अश्विनी सोनवणे, सरला कोकाटे, दिंडोरीप्रणीत स्वयंरोजगार विभाग, आबासाहेब मोरे व क्रिशा फाऊंडेशन दिंडोरी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.