नाशिक दिनकर गायकवाड शहरालगत असलेल्या वडनेर दुमाला येथे काही दिवसांपूवच आयुष भगत या चिमुकल्याला बिबट्यामुळे प्राण गमवावे लागला.ही घटना दुःख शमताच शहरातील सातपूर परिसरात असलेल्या फाशीचा डोंगर,मळे परिसरात बिबटधाच्या पाऊलखुणा दिसून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
विभागाशी संपर्क साधत परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.त्यानुसार वन विभागाने पाहणी करत परिसरात पिंजरा लावला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
युवा उर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी यासंदर्भात वन सातपूर भागातील फाशीचा डोंगर,मळे परिसर, शिवाजीनगर, गंगावन्हे, सावरगाव, गंगापूर, गोवर्धन या भागात बिबट्या असल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी युवा उर्जा
फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांना याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाचे वनपाल सुमित निर्मळ यांना बिबटयामुळे जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करावी,असे निवेदन दिले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी वन परिमंडल अधिकारी यांनी अमोल पाटील यांच्यासोबत संबंधित परिसराची पाहणी करून तेथे पिंजरा लावला.