नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी ननाशी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पेठ पोलीस ठाण्याच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोंदके यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना डायल ११२ या पोलिसांच्या आपत्कालीन सुविधेबाबत मार्गदर्शन करताना असुरक्षित वाटल्यास न घाबरता तत्काळ पालक, शिक्षक आणि पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पो. नि. गोंदके यांनी केले. दरम्यान, यावेळी महिला सक्षमीकरणाबाबतही मार्गदर्शन
करण्यात आले. महिलांची सुरक्षा आणि त्यासाठी असलेले कठोर कायदे याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि करिअर याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पो. नि. गोंदके यांच्या हस्ते आश्रमाशाळा आणि ननाशी पोलीस औट पोस्ट या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य के. पी. चौधरी यांच्या हस्ते पो. नि. गोंदके आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव तुंगार, शेखर देशमुख, मुरलीधर कहाणे, राजू काकडे, पो. नाईक कमलेश पवार, गायकवाड, राऊत, निवृत्ती गवळी, हनुमंत माळगावे, मोहन गवळी, रमेश गवळी, भारती हिंडे आदी उपस्थित होते.
