आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावात जनसेवा युवा मंचचे भव्य उद्घाटन दि.२ सप्टेंबर २०२५,मंगळवार रोजी संध्याकाळी होत असून,संपूर्ण गावात चैतन्याचा माहोल निर्माण झाला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास मा.खासदार तथा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पा.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून फलकाचे उद्घाटन करणार आहेत तसेच ग्रामस्थांना देखील मार्गदर्शन करणार आहेत.गावातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारा हा क्षण मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
संध्याकाळी ६ वा.– महादेव मंदिरापासून झरेकाठी चौकापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत मिरवणूक
संध्याकाळी ६.३० वा. – झरेकाठी चौकात मा.खा.डॉ. सुजय विखे पा. यांच्या हस्ते जनसेवा युवा मंचाच्या फलकाचे उद्घाटन
संध्याकाळी ७.०० वा.–झरेकाठी मारुती मंदिर प्रांगणात मा.खा. डॉ. सुजय विखे पा.यांचे मार्गदर्शनपर जाहीर सभेचे आयोजन
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झरेकाठी गावात दिवसभर उत्सवी जल्लोषाचे वातावरण असून,कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ,मान्यवर व तरुणाई उपस्थित राहणार आहेत.हा उद्घाटन सोहळा झरेकाठी गावासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचे बोलले जातेय.