आश्वी खुर्द प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील
आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मा. मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक व समाजभिमुख व्यक्तिमत्त्व एकनाथ सखाराम ताजणे यांचे दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.निधनसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.
ज्ञानदान हीच खरी ईश्वरसेवा मानून त्यांनी आयुष्यभर शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले.आज त्यांचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकत आहे.शिस्त, प्रामाणिकपणा व निष्ठेच्या आधारावर उभा राहिलेला त्यांचा सेवाकार्याचा वारसा आज अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. गावातील शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या शिकवणीतून अनेक विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आत्मसात करून यशाचा मार्ग गाठला.
दिवंगत.ताजणे यांच्या निधनाने आश्वी परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या शांत, साध्या व प्रेमळ स्वभावामुळे ते प्रत्येकाच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान मिळवून गेले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना,दोन मुली, जावई,भाऊ, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील पत्रकार वैभव ताजणे व प्रेस फोटोग्राफर सचिन ताजणे यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
ऋषीतुल्य व्यक्तीमत्व हरपले
समाजातील सर्व घटकांना शिक्षणासारख्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित धडपड करणारे व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले हि पोकळी कधीही भरून निघणारे सर्वांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वरचरणी चिरशांती लाभो,हिच भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी अनेकांनी दिली
आश्वी प्रेस क्लब ता.संगमनेर