श्रीरामपूर दिपक कदम विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीत पालक गमावलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम येथील शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन होते.या वेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदीक म्हणाल्या,“ की संस्थेने केवळ फोटोसाठी औपचारिक वाटप न करता,विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी पुरेल असे वह्या, शैक्षणिक साहित्य यांसारखे भरपूर साहित्य दिले आहे.ही मदत केवळ शैक्षणिकच नव्हे,तर मानसिक आधारही ठरते.
संस्थेचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांचे सामाजिक कार्य निस्वार्थी असून त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची समाजाला नितांत गरज आहे. त्यांच्या कार्याला माझ्या सदिच्छा.अध्यक्षीय भाषणात सुभाष त्रिभुवन म्हणाले, “संस्थेची स्थापना २००६ साली झाली असून गेली १९ वर्षे आम्ही झोपडपट्टीतील व वंचित घटकांमधील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी,
मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे,कोरोना काळात गरजूंना किराणा किट वाटप,कोविड लसीकरण मोहिमा,अनाथ मुलांना शालेय साहित्य, तसेच जेष्ठ नागरिक, अपंग व विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सातत्याने करत आहोत.
हे कार्य पुढेही अशीच जबाबदारीने सुरू राहील.”कार्यक्रमास मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये,राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, आदित्य आदीक, कवी बाबासाहेब पवार,मिशन वात्सल्याचे बाळासाहेब जपे, अर्जुन शेजवळ,
इनायत अत्तार, दिलीप लोखंडे, शालिनी ससाणे कावेरी शिंदे उषा वाल्हेकर झुलेखा पटेल हिना अतार निर्मला चांदेकर कमल शिरसाट मोनिका साबळे मार्गारेट गायकवाड नीता अमोलिक नेहा काकडे लहानबाई रणनवरे मंगल त्रिभुवन अर्चनाला आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरविंद शेजवळ व अर्जुन शेजवळ यांनी केले.
