नाशिक दिनकर गायकवाड महायुतीने विविध योजनांची घोषणा करत सत्ता मिळवली, मात्र आता या योजनांचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत.विकास कामांना निधी नाही राज्य शासनाची आर्थिक दिवाळखोरीकडे बाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीचाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पशुवैद्यकीय दवाखाना बहुउद्देशीय इमारत सांस्कृतिक भवन भव्य प्रवेशद्वार या विकासकामांचा शुभारंभ
खासदार सुप्रिया सुळे,अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरही झिरवाळ,खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खा. सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी खेडगाव येथील सरपंच दत्तात्रय पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने खेडगाव येथे विविध विकासकामे होत असल्याचे सांगितले.
खासदार भास्कर भगरे यांनी खासदार सुळे यांच्या नेतृत्वात संसदेत आपण सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले, काट्वाचे अध्रायक्ष राम शेटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच दत्तात्रय पाटील यांनी करत विकासकामांचा आढावा घेत विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक व योगिता पवार यांनी केले.यावेळी झिरवाळ,तुम्ही आमच्यासाठी पक्षापलीकडे ना.झिरवाळ,तुम्हाला आम्ही पक्षाचे मानत नाही.तुमची आमची बांधिलकी वेगळी आहे.असे भावनिक आवाहन करत त्या पुढे म्हणाल्या मी शंका सरकारबद्दल बोलतेय. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका,असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.तुमच्या निर्णयावर आमची काही तक्रार नाही,असेही सांगितले.
यावेळी भुजबळांचे कौतुक,कोकाटेंवर हल्लाबोल करत
भुजबळ यांनीही जिल्ह्याचे नेतृव चांगले केल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न पत्ते खेळतानाचे व्हिडिओ काढून अबू काढली अन् तुम्ही त्यांच्यावर अबू घेता नोटीस मुद्यावरून हल्ला चढवला.तुमच्या विचाराच्या कुणीतरी तुम्ही नुकसानीचा दावा करण्याऐवजी रोहित पवारला काय नोटीस देता,असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला.
..म्हणून शहा यांची भेट राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री यांच्याकडेपाच-सहा वेळा वेळ मागितली.मात्र ते वेळ देत नाही.जनतेला संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन ते पाळत नाही.शेवटी आम्ही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटून शेतकऱ्यांचे जिल्हा सहकारी बँकेचे प्रश्न मांडले,असेही सुळे यांनी सांगत मुख्यमंत्री दिलेले आश्वासन पाळत नसल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख जयंत दिडे, चिंतामण गावित, गोकुळ पिंगळे, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे,बाळासाहेब जाधव, प्रशांत कड, वसंत कावळे, रावसाहेब संधान आदीसह ग्रामपंचायत सदस्य, महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते, ग्रामविकास अधिकारी थोरात, खेकरे, राजेंद्र बाघ आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
