प्रेमसंबंध ठेवून लग्नाचे आमिष; फिर्यादीकडून तरुणांसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल

Cityline Media
0

 नाशिक दिनकर गायकवाड प्रेमसंबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी तरुणी ही इंदिरानगर परिसरात राहते.संतोष विलास आल्हाट (रा. प्रभूअपार्टमेंट, चेतनानगर) याने फिर्यादी तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले.त्यातून तिला लग्नाचे आमिष दाखविले.

त्यानंतर फिर्यादी सोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार केला, तसेच गोड बोलून पीडितेकडून पैसे घेतले.पीडितेने लग्नाबाबत विचारले असता आरोपी प्रियकर संतोष आल्हाट याने नकार दिला,तसेच प्रियकराची बहीण चैताली
विलास आल्हाट व मित्र प्रशांत जाधव (रा. नाशिक) यांनी पीडितेस शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार २०२१ पासून २०२५ या कालावधीत सुरू होता.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्रियकरासह त्याची बहीण व मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!