नाशिक दिनकर गायकवाड समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमअंतर्गत चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा ५३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालय नाशिक व मालेगाव येथे प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आले. सदर शिबिरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, आर. एम.ओ. डॉ. सूर्यवंशी, डॉ. आनंद पवार, दीपक चौधरी, संदीप पाटील, उद्धब हंडोरे तसेच उपजिल्हा रुग्णालय चांदवड वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड, डॉ. हेमंत अहिरराव यांनी शिबिरात सहभागी दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व सेवकांतर्फे करण्यात आले