विषारी औषध सेवनाने तरुणाचा मृत्यू
नाशिक दिनकर गायकवाड विषारी औषध सेवन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने वणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मांदाणे येथील अंकुश शिवराम गांगोडे (३४) हा त्याच्या राहत्या घराच्या खोलीत झोपलेला असताना त्यास उठवले असता त्याच्या आजूबाजूला उशीजवळ धान्य टाकायच्या पावडरीच्या दोन पुड्या मिळून आल्या. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यास औषधोपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबतची माहिती वणी पोलिसात शिवराम दगडू गांगोडे यांनी दिली. अधिक तपास स.पो.नि.गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. साबळे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.