संगमनेर प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष यांच्या महायुतीला दिलेल्या भरभरून मत दिलेल्या जनतेचे आभार मानण्यासाठी शहरातील जाणता राजा मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित केली आहे या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी तालुक्यातील निळवंडे येथील बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. छाया-प्रकाश कदम
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष यांच्या महायुतीला दिलेल्या भरभरून आशीर्वादाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी ही सभा होत आहे.या सभेसाठी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. नामदार डॉ. शंभूराजे देसाई तसेच शिवसेना संपर्क मंत्री अहिल्यानगर जिल्हा,मा. खासदार डॉ. सुजय विखे पा.शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि संगमनेचे आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती असणार आहे.
या सभेसाठी निळवंडे गावातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग,ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी वर्ग,प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी आणि कर्मचारी आणि सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक ,शिक्षिका अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका बचत गट सीआरपी,बचतगट अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्य आणि गावातील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सभेसाठी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व बंधू-भगिनींना घेऊन दुपारी तीन वाजेपर्यंत जाणता राजा मैदान संगमनेर या ठिकाणी जमायचे आहे.या सभेसाठी जाण्या येण्याची व्यवस्था निळवंडे ग्रामपंचायत कार्यालय येथून केली असल्याचे निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे तमाम महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निळवंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.