नेवासा विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषदेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त नेवासा तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने मराठी शाळा ज्ञानदेव स्कूल येथे सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.शैक्षणिक साहित्याच्या मदतीने त्यांच्या शालेय शिक्षणाला मोठी चालना मिळेल, असे मत उपस्थित दुर्गावाहिनी विभाग संयोजिका:पूजा लष्करे, मा.पंचायत समिती सदस्य जया घुले,भाजपच्या रश्मी जोशी आदी.मान्यवरांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हीच खरी वर्धापन दिनाची साजरी करण्याची पद्धत आहे,असेही यावेळी सांगण्यात आले.