मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मराठी चित्रपटसृष्टी,
रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्चंद्र" चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात केले.
मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे.छोटा पडदा,मोठा पडदा,ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा,हिच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.