परभणी सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शना खाली नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी उद्धवराव सातपुते, पालम तालुका अध्यक्षपदी केशवराव कराळे व पालम शहराध्यक्षपदी शेख मकदूम यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी ताहेर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले व अभिनंदन करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी व पक्ष संघटन वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
निवड झालेले सर्व पदाधिकारी आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील.तसेच भविष्यात पक्षाच्या वाढीसाठी बहुमोल असे योगदान सुद्धा देतील.पक्षाच्या कामांसह सामाजिक बांधिलकी जोपासून विविध उपक्रम राबवतील,असा विश्वास उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.