नाशिक दिनकर गायकवाड माजी नगरसेविका, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
या प्रवेश प्रसंगी ना.छगन भुजबळ,ना.माणिकराव कोकाटे, ना. नरहरी झिरवळ,ना.प्रमोद हिंदूराव,आ.हिरामण खोसकर, देविदास पिंगळे,अर्जुन टिळे, रविंद्र पगार,अशोक सावंत, अनिल चौगुले,रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधूणे व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. हेमलता पाटील यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत डावलले गेल्याची भावना झाली व त्यातून त्या नाराज झाल्या काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर फुले,शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा पक्ष व
विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी पक्षाची निवड केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या पुढे या पक्षात मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रवक्त्या म्हणून हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे अजित पवार यांनी कौतुक केले. पक्षामध्ये त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली त्यांच्या सोबत काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कल्पेश जेजूरकर, दर्शन पाटील व प्रभागातील २५० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
