मनमाड येथील स्नूकर स्पर्धेत प्रवीण साळवे याने पटकावला प्रथम क्रमांक

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील ज्युनियर इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्नूकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ३२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा चुरशीशी आणि उत्साहात पार पडली.
अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे उपस्थित होते. स्नूकर स्पर्धेचे आयोजन मोन्टी अस्वले,जाहिद खान,अनवर सय्यद,सलीम तांबोळी,गणेश पाटील इम्तिहाज शेख यांनी केले.तर सिद्धार्थ जोगदंड,किरण वाघ,अक्रम शेख,गणेश हाडपे, रॅन झेवियर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रथम पारितोषिक विशाल परदेशी,नदिम सय्यद,द्वितीय पारितोषिक बबलू सय्यद,गोलू कुलथे,तृतीय पारितोषिक विनोद बनसोडे,चतुर्थ पारितोषिक सिद्धार्थ जोगदंड तसेच दानिश खान आणि फरहान पठाण यांच्याकडून विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

तसेच सर्व विजेत्यांना राजेंद्र भावसार यांच्याकडून वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात आले. आदित्य परदेशी आणि अक्रम शेख यांच्याकडून इन्स्टिट्यूटला खेळण्याचे क्यू देण्यात आले. रशीद शेख व सोमा सावंत यांनी संपूर्ण स्पर्धेचे मार्कर म्हणून काम बघितले.

स्नूकर स्पर्धेतील विजेते-ज्युनिअर इन्स्टिट्यूट मध्ये पार पडलेल्या स्नूकर स्पर्धेत प्रवीण साळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर टिपू बागवान यांनी द्वितीय मंदार गुजराती यांनी तृतीय आणि इम्तियाज शेख यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!