नाशिक प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील मान्यवरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक तालुका अध्यक्ष विष्णू थेटे युवा नेते सचिन पिंगळे, प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक उपजिल्हाप्रमुख संतोष गायधनी यांच्यासह नाशिक तालुक्यातील या दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांचा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा जनाधार वाढत असून, पक्षाला नवी ऊर्जा मिळत आहे, यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून येण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने काम करावे, असे आवाहन यावेळी अजित पवारांनी केले. सर्व नवीन सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.मंत्री आ.अनिल पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आ.शिवाजी गर्जे,आ. संजय खोडके, मा खासदार देविदास पिंगळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,प्रदेश सरचिटणीस.लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनिल मगरे,प्रदेश सचिव निलेश कुलकर्णी,नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
