राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची घटना सिडकोत घडली.
मनीषा नामदेव गवांदे (वय १९, रा. विजयनगर, सिडको) या युवतीने काल सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्टोअर रूममध्ये असलेल्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!