श्रीरामपूर दिपक कदम शहरातील बहुजन शिक्षण संघ संचलित शंभूक विद्यार्थी वस्तीगृहात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते अरुण मंडलिक व परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त गोरख आढाव यांचे हस्ते प्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक कार्यकर्ते अरुण मंडलिक यांच्या हस्ते वस्तीगहाचे
ध्वजारोहण करण्यात आले.
भाजप अल्पसंख्याकचे साजीद शेख व सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आल्हाट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप डॉ.सलिम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त वस्तीगृहातील विद्यार्थी अनुक्रमे नमो करंडे,गौरव कहाते,ऋषिकेश सुलताने, साई गायकवाड ,अजित जाधव,भरत भालेराव,अमोल घुले,साई गायकवाड, आर्यन घुले, ओम जवादे यांनी देशावर आधारित भाषणं करून देशभक्तीपर गीते सादर केली.शंभुक विद्यार्थी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिले.
या प्रसंगी विद्रोहीचे डॉ सलीम शेख युनायटेड इन्शुरन्सचे व्यवस्थापक राकेश बाविस्कर,गोरख आढाव , पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष मोकळ,बहुजन वंचितचे किशोर ठोकळ, संतोष त्रिभुवन,ॲड.अमोल सोनवणे, मिशन वासल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, ह भ प निलेश भालेराव, भाजपा अल्पसंख्याकचे साजिद शेख,बहुजन टायगर फोर्सचे संजय रूपटक्के, संजय पिटेकर, दादासाहेब बनकर,एकता यंग सर्कलचे तौफिक शेख मा. विद्यार्थी बाबासाहेब पंडित, निशिकांत खरात,संतोष त्रिभुवन, बाबासाहेब गायकवाड,प्रविण गायकवाड,अमोल वडितके,नंदा पंडित,रुपाली त्रिभुवन,कविता दुबे ,कविता दिवे, राहीबाई बर्वे,मनीषा घुले,,वर्षा तुजारे,शाहीर दगडू नरवडे ॲड.मिलिंद धीवर, ,आलोक थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक दिवे,सिध्दार्थ दिवे,यांनी प्रयत्न केले.
