डॉ. सुजय विखे पा. यांची घोषणा
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारक रेल्वे स्टेशन समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेवर उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी मा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याची मोठी घोषणा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी नियोजित जागेची सविस्तर माहिती दिली.
डॉ. सुजय विखे यांनी अहिल्यानगर येथे उभारलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या धर्तीवर श्रीरामपूर येथेही आधुनिक रचना असलेला भव्य पुतळा उभारण्याच्या सूचना रचनाकाराना दिल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, “पुतळा केवळ देखणाच नव्हे तर प्रेरणादायी असावा, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”
सुभाष त्रिभुवन यांनी डॉ. आंबेडकर स्मारकासाठी रेल्वे प्रशासनाकडे आणखी दोन गुंठे जागा मागण्यासाठी प्रस्ताव देण्याचे विनंती केली . तसेच, १६ डिसेंबर १९३९ रोजी बेलापूर रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब उतरले होते,याची आठवण करून देत बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेलापूर श्रीरामपूर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रीरामपूर असे नाव देण्याची मागणी केली. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या अडचणी दूर केल्याबद्दल मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा भीमराज बागुल राजाभाऊ कापसे सचिन ब्राह्मणे विजय पवार प्रकाश ढोकणे राजू नाना गायकवाड संतोष मोकळ सौ.रमादेवी धीवर संतोष मोकळ त्यांनी निळी टोपी पुष्पहार घालून सत्कार केला
कार्यक्रमात ,चरण त्रिभुवन, किशोर ठोकळ, रॉकी लोंढे, अमोल काळे, संजय बोरगे, सुमेध पडवळ, दादासाहेब बनकर, मिलिंद धीवर उज्वला येवलेकर तसेच भाजपाचे दीपक पठारे, बाबासाहेब चिडे, जितेंद्र साजन, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी,नाना शिंदे,शरद नवले, संदीप चव्हाण अंजाबापू गोल्हार भैय्या भिसे शरद भणगे राहुल शहाणे रईस शेख शाहरुख मन्सुरी राकेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे श्रीरामपूरमध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे स्मारक उभे राहणार असून, आंबेडकरी जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.