नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील काशिशेबा येथील एका ३१ वर्षीय आदिवासी शेतकऱ्याला नागाने देश केला.गावकऱ्यांनी लगबगीने त्याला पळसन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याच्यावर येथे उपचार करून त्याची प्रकृती सुधारली आहे.
येथील शेतकरी हंसराज गवित (वय ३१) हे शेतीची कामे करीत असताना त्यांना कोब्रा जातीच्या विषारी सापाने दंश केला. काही मिनिटांत त्यांची प्रकृती खालावू लागली. डोळ्यांवर झापड येऊन डोळे बंद होऊ लागले, तसेच श्वास घेण्यास त्रास,उलट्या सुरू होऊन रुग्ण बेशुद्ध झाला.
गावकऱ्यांनी वेळ न दवडता हंसराज यांना ४ किमी अंतर पार करीत कसेबसे पळसनच्या आरोग्य केंद्रात पोहोचवले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉ. सचिन पाटील यांनी या रुणाला त्वरित सर्पदंश प्रतिबंधक डोस दिला. यावेळी सौरदिवा व मोबाइल फ्लॅशचा उपयोग करून उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णाचे प्राग वाचले.