नाशिक दिनकर गायकवाड मागील भांडणाची कुरापत काढून तिघांनी मिळून महिलेच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उत्तमनगर येथे राहत असलेल्या फिर्यादी महिलेच्या मुलाचे आणि आरोपी सचिन दांडेकर(रा. औदुंबर स्टॉप, लेखानगर), स्वप्नील जाधव (रा. राणेनगर पेट्रोल पंपाजवळील झोपडपट्टी) व त्यांचा एक मित्र यांचे गेल्या एक वर्षापासून वाद होते.
जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा आरोपींनी दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात
दरवाजाचा कडीकोयंडा तोडून शिरले. त्यांनी घरातील टीव्ही व इतर वस्तूंची तोडफोड करून सर्व वस्तू इतरत्र फेकून दिल्या. या प्रकरणी तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार बनतोडे करीत आहेत.