वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सातपूरला अचानक चारचाकीने घेतला पेट

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सातपूर येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रगती शाळेसमोर चारचाकी वाहनाच्या वायरींगमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक वाहनाने पेट घेतल्याची घटना घडली. वाहनातून धूर निघू लागल्याने आजूबाजूला राहणारे नागरिक घाबरले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास एमएच-०५-एफजे -४७१२ या वाहनाच्या ड्रायव्हरने श्रमिकनगर या ठिकाणी प्रवासी सोडले. नंतर सातपूरकडे जात असताना अचानक या वाहनाने पेट घेतला. वाहनातील ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत तत्काळ वाहन थांबवून

बाहेर उडी मारली. या ठिकाणी उपस्थित असलेले मनसे नाशिक शहर संघटक वैभव रौंदळ व परिसरातील स्थानिक नागरिकांनी देखील तत्काळ धाव घेतली आणि पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

अंदाजे वाहनाच्या समोरील भागाला आग लागल्याचे निदर्शनास आले असून, वायरींगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!