दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका

Cityline Media
0
वर्षभरात एकूण ७५ मुलींचा शोध व पालकांच्या ताब्यात

राहुरी प्नतिनिधी राहुरी येथील पोलीस ठाण्यात पोलिस ठाण्यात गु.र.नंबर  ४०९/२०२५ भारतीय न्याय सहिता कलम १३८(२) , प्रमाणे ११एप्रिल२०२५  रोजी  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काही एक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला  राहुरी पोलीस ठाण्याला आणून  सदर पीडितेस  तिचे  नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.  व अपहरण करणारा युवकास ताब्यात घेऊन पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने  हे करत आहेत.

 ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलींचा शोध घेऊन  गेल्या वर्षभरात ७५ मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.  
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे अधीक्षक 

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक.संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव ,पो.कॉ.अशोक शिंदे,  पोकॉ. गणेश लिपणे पो.कॉ. सचिन ताजने  , म.पोकॉ.शितल थोरात , मीना नाचन  नेमणुक राहुरी पोलीस ठाणे व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक  मोबाईल सेल यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!