पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश विविध मान्यवरांच्या हस्ते सुपुर्त
श्रीक्षेत्र देवगांव शनि दिपक कदम सद्गुरू महंत गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून यावर्षी श्रीक्षेत्र देवगांव शनि येथे सुरू असलेल्या १७८व्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत झाली.
यानिमित्ताने उपस्थित लाखो भाविकांशी संवाद साधून हा अध्यात्मिक क्षेत्रातील वारकऱ्यांच्या महाकुंभ असून सनातन हिंदु धर्म संस्कृती परंपरेचं विराट दर्शन आहे. हा सप्ताह म्हणजे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगितले !
अखिल विश्वाला पसायदानाच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीला येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५० वर्ष पूर्ण होत आहेत. या औचित्याने राज्य सरकारने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे यावेळी अभिनंदनही केले.