नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी, ग्रामदैवत मोहाडमल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त मोहाडी येथे गेल्या पंधरा दिवसापासून ज्ञान, भक्ती आणि शक्तीनेयुक्त भरगच्च कार्यक्रमांनी यात्रोत्सव पार पडला.
उत्सवाची सुरुवात विविध विषयांवरील प्रचोधन व्याख्यानमालेने होऊन भक्तीने युक्त किर्तन माला,भागवत कथन,श्रीकृष्ण जन्म,भजन संध्या,गोपाळकाला, दहीहंडी, कानिफनाथाचे वारे तर शेवटी शक्तीची उपासना म्हणजे भव्य कुस्तीच्या स्पर्धेन सांगता झाली. मोहाडी गाव पूर्वीपासून स्थानिक मल्ल व कुस्तीच्या स्पर्धेमुळे कुस्ती शौकिनांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. यावर्षीही गोपाळकाल्याच्या दिवशी छोटेकडे तर दुसऱ्या दिवशी मोठ्या कड्यात स्पर्धा झाल्या. त्यात ग्रामस्थांच्या देणगीतून अनेक छोट्या मोठ्या तर स्मरणार्थ परिवाराकडून प्रायोजित मानाच्या मोठ्या कुस्त्याही झाल्या. त्यात प्रामुख्याने के. सुनील गंगाधर जाधव गुरुजी यांच्या स्मरणार्थ ढाल व ५५५५ रुपये ही अंतिम लढत विजय गवळी (मालेगाव) व विकास मोरे (कांजवण) यांच्यात होऊन बिकास मोरे याने विजय मिळवला. यात्रोत्सव समितीचे माजी अध्यक्ष के. गणपत माधवराव जाधव यांच्या स्मरणार्थ गदा व २५०० रुपये साठी पृथ्वीराज यज्ञेकर (चांदवड) व वैभव तुपे (भगूर) यांच्यात लढत होऊन वैभव सुपे याने विजय मिळवला. दिवंगत पंच के. शिवाजी श्रीराम जाधव यांच्या स्मरणार्थ ५००० रुपये साठी आशुतोष चंदन (चांदवड) व किरण पवार (लखमापूर, सटाणा) व कै. गंगाधर खंडेराव जाधव यांच्या स्मरणार्थ गदा व २५५५ रु. साठी
संदीप बिनर (चांदवड) व सार्थक नागरे (पिंपळगाव) यांच्यात लढत झाली. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही स्पर्धा अनिर्णित राहन दोन्ही स्पर्धकांना बक्षीस विभागून देण्यात आले. के, पांडुरंग देवराम कदम गुरुजी यांच्या स्मरणार्थ गदा व रु.२१०० यासाठी नवनाथ मालसाने (कोहाटे) व अजय गवळी (धुळे) यात लढत होऊन नवनाथ मालसाने यांने विजय संपादन केला. बाहेरील पैलवानांसोबतच स्थानिक पहिलवान सुनील जाधव, शरद मोगरे, समाधान जाधव, कार्तिक
मोगरे यांनीही यश संपादन केले. मुलींमध्ये श्रावणी शिंदे (मोरंबी, इगतपुरी) व कस्तुरी जाधव (मोहाडी) यांनीही आपले कुस्तीतील प्राविण्य दाखवून वाहवा मिळवली. त्यात श्रावणी शिंदे हिने विजय मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण मविप्र संचालक प्रवीण जाधव, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. विलास देशमुख, पंच कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, लक्ष्मण कळमकर, शांताराम मौले, शामराव जाधव, शशिकांत निकम, प्रायोजक स्वप्निल जाधव, सतीश जाधव, रवींद्र
जाधव, भाऊसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाकेराव मौले, संतोष लहांगे, स्पर्धा परीक्षक पंच यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून विठ्ठल जाधव, माणिक जाधव, पंडरीनाथ कळमकर, सर्जेराव देशमुख, बाळासाहेच जाधव, सुरेश जाधव, प्रकाश मौले, निखिल जाधव, उत्तम मौले यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रा. कै लास कळमकर व सुदर्शन जाधव यांनी तर आभार धनंजय बानले यांनी मानले, चित्रीकरण प्रथमेश जाधव यांने केले. कुस्ती स्पर्धेसह सर्व यात्रा उत्सवात दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार प्रमोद मुंडे, ललित जाधव यांनी बंदोस्त ठेवला होता.
