नाशिक दिनकर गायकवाड राज्यात बैलपोळा सणानिमित्त मातीच्या बैलांना मागणी वाढली असून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील या मातीच्या बळीराजास मागणी वाढली आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या बाजारपेठा बैलपोळा सणासाठी सज्ज झाल्या आहेत मातीच्या बैल खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे.
उद्या बैल पोळा सण असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने बेल पूजेला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यांचे कडे खरे खुरे बेल आहेत त्यांची बैल धुणे त्यांना सजविण्याच्या लगभग सुरू आहे.आधुनिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे बेलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे पोळा सणाला बैल पूजा करण्यासाठी मातीच्या बैलांना महत्व प्राप्त
झालेले आहे.त्यामुळे मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. ग्रामीण भागातील कुंभार समाजाकडून आजही मातीचे बैल बनवण्याची परंपरा सुरूच असल्याचे दिसत आहे. वर्षभर शेतात मेहनत करून घाम गाळून पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची साथ देणाऱ्या सर्जा राजाची सन्मानाने पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घालून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. या श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावश्याला येणाऱ्या सणासाठी सध्या ग्रामीण भागात कुंभार समाजातील अनेक
