संभाजीनगर सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवळाना येथे डॉ. विजय गजानन सुरासे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
डॉ. सुरासे हे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ असून,ते डॉ.विजय सुरासे चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक आहेत.या उद्घाटन समारंभाला अंबादास दानवे यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. डॉ. सुरासे यांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या या योगदानाबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.