राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.यावेळी मंत्री पंकजा मुंडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

या प्राधिकरणाद्वारे नदी पुनरुज्जीवनासाठी डीपीआर व खोरे व्यवस्थापन योजना मंजूर करणे, अतिक्रमण, वीज, भूसंपादन यासंबंधी अडचणी सोडवणे, राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्ये करण्यात येणार आहेत. या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. यासोबतच पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती कार्यरत राहील. या राज्यस्तरीय समितीमध्ये तांत्रिक तज्ज्ञ, वित्तीय व कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव तसेच आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांतील तज्ज्ञ सदस्य यांचा समावेश असेल.

राज्यातील नद्यांचे शाश्वत पुनरुज्जीवन करण्यासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी एमपीसीबीचे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालयही स्थापन करण्यात येणार आहे.यावेळी मंत्री पंकजा मुंडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!