बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या विविध प्रलंबित कामांवर मार्ग काढण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीला उपस्थित राहून वीज प्रश्नांबद्दल मतदारसंघाच्या दृष्टीने विविध मागण्या केल्या या सर्वांना आश्वासित करण्यात आले.
केज मतदारसंघातील आरडीओएसएस योजने अंतर्गत नवीन ३३ केव्ही उपकेंद्र, जुन्या उपकेंद्रात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे, तसेच कृषी वाहिन्यांवरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी ६३ के व्हीए व १००केव्हीएचे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय केज शहर व ग्रामीण भागातील एच टी व एल टी लाईनचे पोल आणि तारा बदलण्याची, रिक्त अभियंता पदे भरून देण्याची तसेच सौर कृषी वाहिनी अंतर्गत अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
कोरेगाव सारख्या गावांचा आरडीएसएस अंतर्गत समावेश करून त्यासाठी नवीन ११ केव्ही लाईन मंजूर करणे, विविध उपकेंद्रांवर उपकरणे बसवणे, ट्रान्सफॉर्मर ऑईल व नव्या ट्रान्सफॉर्मरची उपलब्धता सुनिश्चित करणे, तसेच वाघाळा, आडस, पाथरा येथे १३२ केव्ही व बरड येथून २२० केव्ही उपकेंद्रांपासून पुढे नवीन ३३ केव्ही फिडर टाकणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. युसुफ वडगाव, धनेगाव, जवळबन, साळेगाव यासारख्या उपकेंद्रांमध्ये व्हीसीबी, सीटी, पीटी, इंस्टॉरल आणि अर्थिंगची दुरुस्ती करून क्षमता वाढवण्याची मागणी केली.
अंबाजोगाई उपविभागात नवीन दोन उपविभाग तयार करणे, पठाण मांडवा गावाचा अंबाजोगाईमध्ये समावेश करणे, तसेच ५१९ उच्चदाब व ४८९ लघुदाब पोल, १०७ वितरण बॉक्स बदलणे, ४७केएम नवीन १ केव्ही लाईन उभारणे आणि शेती फिडरवरील भार कमी करण्यासाठी २२ लाईन कॅपॅसिटर बसवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. अंबाजोगाईतील कनिष्ठ व सहाय्यक अभियंत्यांच्या रिक्त पदांच्या भरती साठी पाठपुरावा केला.