आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला,वाणिज्य,विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयात पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच चैतन्यमय वातावरणात पार पडली.
राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा.,मा. जि.प. अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील व मा.खा.डॉ.सुजय विखे पा.यांच्या प्रेरणेने व कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पा.यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे,पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक वारसा जपणे या हेतूने महाविद्यालयाने शाडू माती उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध आकारातील आकर्षक मूर्ती तयार केल्या.यातुन उत्कृष्ट मूर्तीची प्रतिष्ठापना येथे करण्यात येणार आहे.
प्रसंगी प्राचार्य देवीदास दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. कु. श्रद्धा डहाळे हिने प्रात्यक्षिक सादर केले.प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय लोखंडे यांनी तर आभार प्रा. अश्विनी आहेर यांनी मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.दिपाली तांबे,महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने लक्षणीय सहभाग होता.
