राजमाता गोमाता या संकल्पनेतून गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती

Cityline Media
0
दाढ खुर्द येथील कु.राधिका गव्हाणे यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि चर्चा 

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावातील कु.राधिका राजेश गव्हाणे यांनी गाईच्या शेणापासून शुद्ध,सात्त्विक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून समाजासमोर एक अनोखा लोकाभिमुख संदेश ठेवला आहे या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होऊन कौतुक होत आहे.
गव्हाणे कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून गौ सेवेत कार्यरत असून “राजमाता गोमाता” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गाईच्या शेणापासून पारंपरिक गोवरी, औषधी धूपबत्ती,सांब्राणी कप यांसह गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात येते. विशेष म्हणजे या मूर्तींचे विसर्जन पाण्याचे प्रदूषण न करता शेतीस उपयुक्त खत बनते.

या विक्रीतून मिळणारे उत्पन्न आनंद दिवाकर तीर्थ लक्ष्मी नारायण गौशाळा (दाढ खुर्द) व लीला पुरुषोत्तम गौशाळा (भिवंडी) येथील गाईंच्या चारापाणी व आरोग्यसेवेसाठी वापरण्यात येते.

कु. राधिका गव्हाणे म्हणाल्या की, “आमचे उद्दिष्ट केवळ उत्पादन विक्री नसून गोसेवा व गोसंवर्धन हेच आहे. प्रत्येक निर्मितीत श्रद्धा, निसर्ग व सात्त्विकतेचा संदेश द्यायचा आहे.”

हा उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरत असून तरुणाईला मूर्ती बनवा निसर्गाशी सुसंवाद ठेवून, विसर्जन करा जलप्रदूषण टाळा असा संदेश दिला आहे.गोमातेचे रक्षण म्हणजेच आरोग्य व संस्कृतीचे संरक्षण अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!