सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांचा प्रशासनाला संतप्त सवाल
श्रीरामपूर दिपक कदम खाजगी सावकारी नियंत्रित करण्यासाठी बनवलेला कायदा महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ हा कायदा खाजगी सावकारी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आला आहे परंतु ह्या कायद्याला धाब्यावर बसवून तालुक्यातील बेलापूर बुद्रुक मध्ये खाजगी सावकारांनी उच्छाद मांडला आहे.
गावात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झालेला असताना ग्रामपंचायत मात्र गप्प का आहे, एखाद्याचा जीव गेला तरच प्रशासनाला जाग येईल का?असा थेट सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी केला आहे.
श्री.नाईक यांनी बेलापूर ग्रामसेवक,सरपंचांना पत्र पाठवत विचारले की खाजगी सावकारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना आपण पाठवली का?
नसेल, तर त्यांना तुमचा छुपा पाठिंबा आहे का?
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायतने पावले उचललेली नाहीत,याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे.
“गाव बुडतंय आणि ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे,” असा त्यांचा आरोप आहे.बेकायदेशीर सावकारी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने जबाबदारी पार पाडली नाही तर कारवाईची मागणी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
