कोतूळात ऋषिपंचमी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

Cityline Media
0
अकोले विशाल वाकचौरे तालुक्यातील कोतुळ येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री.वरदविनायक मंदिरात ऋषिपंचमी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा भक्तीमय सोहळा गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ठिक ६.०० वाजता उत्साहात पार पडला.
जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने गेली १३ वर्षे या पठणाचे आयोजन होत असून, भाविकांचा वाढता प्रतिसाद हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले आहे. पहाटे शंखनाद व ओमकाराच्या गजरात अथर्वशीर्ष पठणास प्रारंभ झाला. “हरिओम नमस्ते गणपते… त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी…” या मंत्रोच्चाराने संपूर्ण मंदिर परिसर चैतन्यमय झाला.

पठणाचे नेतृत्व कु. परिमल भाटे व विद्या परशुरामी यांनी केले. सौ.अनिता व. देवानंद पोखरकर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.देवस्थानच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी मान्यवरांचा सन्मान केला. या वेळी डॉ.सुभाष सोमण, वासुदेव साळुंके,अनिल पाठक, बाळासाहेब पोखरकर,संभाजी पोखरकर, विशाल,बोऱ्हाडे गुरुप्रसाद धुमाळ,कुलदीप नेवासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनय समुद्र विशाल बोहाडे,सचिन पाटील, संतोष घाटकर, सागर सोनुले, निलेश घोडे, अजित आरोटे, सौ.वर्षा नेवासकर,सौ. वंदना पाठक, सौ.विद्या परशुरामी, सौ. सविता घाटकर, सौ. प्रियांका पाटील, सौ.द्वारका पोखरकर, सौ. प्रियांका नेवासकर, प्रज्ञा भाटे, वृषाली समुद्र यांनी परिश्रम घेतले.

या प्रसंगी महिलांनी ऋषींचे पूजन करून परंपरेला उजाळा दिला.सौ.विद्या परशुरामी यांनी पोथी वाचन केले.

 श्री गणेशाची उपासना ही ऐक्य, बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता वाढवणारी असल्याने, कोतुळसारख्या ग्रामीण भागातील हा सामुदायिक उपक्रम भाविकांसाठी अध्यात्मिक उर्जा व संस्कारांचा महत्त्वपूर्ण सोहळा ठरला असे भावनिक मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!