संगमनेर विशाल वाकचौरे शहरातील वर्दळीच्या आणि नेहमी गजबजलेल्या मेन रोड वर हौशी लोक सण उत्सवात नेहमी कर्णकर्कश वाद्ये वाजवून शांतता भंग करत त्यातील डि.जे.च्या आवाजाने लहान मुले आणि वृद्धांची घबराट होते हे सहन करण्यापलीकडे गेले आहे येथील व्यापारी व नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात नुकतेच सामूहिक निवेदन सादर करून मेनरोडवर कर्णकर्कश आवाजात वाजणाऱ्या डी.जे. वाद्यांवय बंदी घालावी,अशी मागणी केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोणत्याही सण, उत्सव,वाढदिवस किंवा मिरवणुकीत मेनरोडवर डी.जे. वाजवला जातो.यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून घरामध्ये कंपन निर्माण होऊन वस्तू खाली पडतात.तसेच लहान मुले,ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
यापूर्वी शांतता कमिटीच्या बैठकीत नगर जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कुठेही डी.जे. वाजल्यास तात्काळ जप्त करण्याचे व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने या आदेशांची पायमल्ली करून दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
निवेदनात व्यापारी व नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर मेनरोडवर डी.जे.वाजवण्यास परवानगी दिली,तर न्यायालयाचा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
या संदर्भातील निवेदन अर्जाची प्रत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार अमोल खताळ जिल्हा पोलीस प्रमुख,अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर यांना पाठविण्यात आली आहे.तर मेनरोडला कोणत्याही सणाला किंवा कार्यक्रमाला डी.जे. वाजवण्यास परवानगी देऊ नये या मागणीसाठी येथील नागरिक आणि व्यापारी ठाम असल्याचे बोलले जातेय
