नाशिक दिनकर गायकवाड ठाकरे गटाचे पंचवटी विभागप्रमुख नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना विविध समस्यांबाबात नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की पंचवटीतील कारवाल नगर ते अमृतधाम तसेच मीनाताई ठाकरे स्टेडियम ते तारवाला नगर, यामध्ये तीन ते चार माध्यमिक व प्राथमिक शाळा आहेत.सकाळी व सायंकाळी शाळा प्रवेशद्वार परिसरात मोठी गर्दीअसते.
त्यावेळी पिकअप तसेच अवजड वाहने सुसाट वेगाने येथून जातात.त्यामुळे अपघात होण्याच्या संभावना निर्माण होतात.विद्यार्थ्यांचे यापूर्वीही अपघात होऊन जीवित हानी झालेली आहे.काही फळ विक्रेते चौफुलीवर दुकान मांडून बसतात त्यामुळे ट्राफिकची मोठी समस्या निर्माण होते.
यापूर्वीही विभागीय आयुक्तांना देखील दोन ते तीन वेळी निवेदन दिले आहे. शाळेतील मुख्य प्रवेशदार चौका जवळ पोलिसांची नेमणूक करावी जड वाहनास प्रवेश बंद करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावळी विभाग प्रमुख नितीन जाधव, उपजिल्हाप्रमुख दिलीप मोरे उपमहानगरप्रमुख संजय थोरवे, उपमहानगरप्रमुख सुनील निरगुडे, सचिन अहिरे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख शोभा दिवे,उपमहानगरप्रमुख जयर्थी खेताडे, इंदुबाई गायकवाड, चंद्रकला कंक,शैला पिंपळे व पदाधिकारी उपस्थित होते.
