नाशिक दिनकर गायकवाड स्वतःची चूक असताना उर्मटपणे बोलणाऱ्या परप्रांतीयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा बनला होता.
येथील जयभवानी रोड येथे एका मुजोर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी असलेल्या लासूरे या मराठी कुटुंबियावर दादागिरी करून शिवीगाळ व मारहाण केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता नेहमीच दादागिरी करण्यात हा परप्रांतीय सराईत होऊ पाहत होता.
नुकतेच हा परप्रांतीय चार चाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेजर गाडीला धडकला.यात गाडीचे नुकसान झाले.लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर त्याने कुटुंबाला शिवीगाळ करत 'तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो,तुम्हारी गाडी और घर भंगार हैं'असे म्हणून दादागिरी करू लागला.
त्यानंतर जयभवानीरोड येथील स्थानिक मनसेचे पदाधिकाऱ्यांना याबाबत समजल्यावर त्यांनी त्या परप्रांतीयाला समज दिली.परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की मला मराठी येत नाही व न मी हिंदीत बोलणार, तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला, असे तो म्हणाल्यावर एका मनसैनिकाने त्याच्या कानशिलात लगावली व लासुरे कुटुंबियाची माफी मागण्यास सांगितले.
