भंडारा सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथील येथील जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या सभेला शिक्षण मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांसोबत थेट संवाद साधला.
या संवादाच्या माध्यमातून शिक्षण विभागातील कामकाज, चांगल्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या पायाभूत कौशल्यांचा विकास आणि शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पद्धतींचा वापर यावर सखोल चर्चा केली. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना शिक्षकांनी नवोन्मेषी दृष्टिकोन ठेवावा,असे स्पष्ट करत मार्गदर्शन केले.
यानंतर भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,गणेशपूर या शाळेला प्रत्यक्ष भेट दिली.शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासक्रम, कलागुण, वाचन, लेखन व गणित विषयातील प्रगतीची माहिती जाणून घेतली.शाळेतील शिक्षकांशीही त्यांनी संवाद साधून माहिती घेतली.
यावेळी.सौ.अध्यक्षा कविता उईके. मिलिंद कुमार साळवे (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा. राजेश रुद्रकार, प्राचार्य डायट भंडारा. एकनाथ संस्था, उपाध्यक्ष,जि. प. भंडारा. श्रीमती शितल राऊत, समाजकल्याण सभापती,. नरेश ईश्वरकर,सभापती शिक्षण व बांधकाम. आनंद मलेवार, सभापती अर्थ व आरोग्य,. श्रीमती अनिता नलगोपुलवार, सभापती, महिला व बालकल्याण, मा.डॉ. माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर,. यशवंत सोनकुसरे जि.प. सदस्य,. रमेश पारधी माजी शिक्षण सभापती,. रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी (प्राथ),मंगला गोतारणे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आदी उपस्थित होते.