-पंचायत समितीचे गटविकास आधिकारी संदिप वायाळ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
-नाथपंथी समाज्याने गटविकास आधिकारी व स्वारिपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांचा सत्कार करून आभार मानले
-भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण पेढे भरून आनंदोत्सव साजरा
येवला प्नतिनिधी तालुक्यातील बाभुळगाव येथे १९९८ साली ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी खरे कुटुंबीयांच्या जमिनी १हेक्टर ५६आर अधिग्रहण करण्यात आली होती.त्यात खरे परिवाराची जमीन अधिग्रहित केली होती त्यांनी याबाबत नुकतेच उपोषण सुरू केले होते.रिपब्लिकन स्वाभिमानी पक्षाचे महेंद्र पगारे यांच्या मध्यस्थीने खरे कुटूंबाची शासन दरबारी दखल घेण्यात आली असून त्यांना घरे बांधण्यासाठी प्रत्येकी १ गुंठा जमीन देण्याचे येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आहे.
या घटनेस तब्बल २८ वर्ष उलटून गेली तरी देखील इथल्या नाथपंथी खरे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही ह्या लोकांनी अनेक वर्षापासून शासन दरबारी लेखी व तोंडी स्वरूपात न्याय मागितला तरी पण कोणीच लक्ष देत नाही अखेर हे सर्व लोक नुकतेच आपल्या मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर पोपट खरे व इतर महीला व पुरुष(नाथपंथी )हे न्याय हक्कासाठी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी बसले होते.
दिवसभर उपोषण सुरू होते तरी देखील पोलीस सोडून एकही आधिकारी आले नाही म्हणून खरे परिवाराने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे यांना दुरध्वनी करून कळवले महेंद्र पगारे यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन गट विकास अधिकारी.संदिप वायाळ पंचायत समिती येवला यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी करून गटविकास अधिकाऱ्यांनी सुरू असलेले १ मे २०२५ रोजी चे उपोषणातील काही मागण्या मान्य करून लेखी स्वरूपात काही कालावधीतच पूर्ण करून देण्याचे मान्य केले आहे.त्यामुळे गटविकास अधिकारी व महेंद्र पगारे याच्या हस्ते निंबु शरबत देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते.
मागण्या खालील प्रमाणे
१)महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आधीकारी यांनी राहण्यासाठी प्रत्येकी एका व्यक्तीस एक घर देण्यात यावे
२)प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यानात यावी
३)स्मशानभूमी साठी जागा नावावर करून द्यावी
४)अधिग्रहण झालेली जमिनीची योग्य रक्कम देण्यात यावी
वरील मागणीनुसार १४ लोकांना राहण्यासाठी प्रत्येकी १गुंठा अशी १४गुंठे जागा जिल्हाधिकाऱ्यांनी १९ ऑगस्ट २०२५रोजी लेखी आदेश दिला व तो आदेश मा.गटविकास आधिकारी यांनी खरे परिवार महेंद्र पगारे यांचे कडे दिला त्यामुळे खरे परिवार अतिशय आनंदी झाला त्यांनी लगेच भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले व गटविकास आधिकारी संदिप वायाळ व महेंद्र पगारे यांचा सत्कार केला व पेठे भरवत आनंद साजरा केला
आदेशानुसार पोपट जगन्नाथ खरे,मच्छिंद्र जगन्नाथ खरे,भारत जगन्नाथ खरे ,नवनाथ लहानू खरे,राजेंद्र लहानू खरे, मनोहर लहानू खरे, विनोद रामदास खरे, विशाल रामदास खरे,संदिप पोपट खरे,जन्याबाई जगन्नाथ खरे अन्नपूर्णाबाई जगन्नाथ खरे,नाना परसराम खरे,अण्णा योगिराज चव्हाण, सुरेश नवनाथ खरे अशा लोकांचा समावेश आहे.
-एक गुंठ्याचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेऊ
खरे परिवारातील शेतजमीन ३८ गाव पाणी पुरवठा योजनेत गेल्यामुळे शासनाने दुर्लक्ष केले होते त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांना घरे बांधण्यासाठी प्रत्येकी १ गुंठा जागा मिळाल्याबद्दल आनंदच आहे.परंतु त्यांना जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तो पर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील
महेंद्र पगारे,
जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष नाशिक
