मालेगाव पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी

Cityline Media
0
सामाजिक कार्यकर्त्यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

नाशिक दिनकर गायकवाड पाटबंधारे विभाग मालेगांव येथे सन २०२३-२४,२०२४-२५ या आर्थिक वर्षात पाटबंधारे विभाग मालेगांव कार्यकारी अभियंता मनोज डोके,उपकार्यकारी अभियंता आर.एस.निकम, उपविभागीय अभियंता महेंद्र नेटावटे,उपविभागीय अभियंता सटाणा एस.पी.खैरनार, उपविभागीय अभियंता कळवण अक्षय काळे,शाखा अभियंता अक्षय दिघे,शाखा अभियंता विशाल सानप,शाखा अभियंता अनिल बागुल, शाखा अभियंता धनराज गावीत व लेखा शाखा १,२,३ यांनी शासन निधीचा दुरुपयोग करुन कागदोपत्री मंजुरी घेऊन प्रत्यक्षात दर्जाहिन अस्थितवात नसणाऱ्या कामासाठी बिलांची मंजुरी करुन कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचारा संबंधी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करुन संबंधीत अधिकाऱ्यांची जंगम व स्थावर मालमत्तेची ई.डी. मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी येथील सामाजिक येथील उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते बुध्दभुषण तुपलोंढे,दिपक शेजवळ,योगेश जगताप यांनी नुकतेच नाशिक रोड येथील विभागीय महसुल आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याने नाशिक जिल्ह्यातील अनागोंदी समोर येण्याच्या शक्यतेने सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
उपोषणकर्ते योगेश जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रार निवेदनाद्वारे सांगितले आहे की जनमाहिती अधिकारी व उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता मालेगांव पाटबंधारे विभाग, च.मा. लिपीक लेखा शाखा १, २, ३ संबंधितांवर दिरंगाईसह शिस्तभंगाची कारवाई होण्यासाठी  अर्ज दाखल केले होते.

आपणास निवेदन सादर करतो की,मी मालेगांव पाटबंधारे विभाग,मालेगाव यांचेकडे माहिती अधिकार-२००५ कायद्यान्वये माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु माहिती ११/२०२४ रोजी प्रथम अपील झाले व दि.०९/१२/२०२४ रोजी प्रथम अपील निर्णय पारीत होऊन नाशिकरोड मोफत माहिती देण्याचा आदेश देण्यात आला.

म्हणून जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता मा.रा.शा. निकम यांना समक्ष भेटून माहिती मागितली.परंतू त्यांनी माहिती दिली नाही कि कोणालाच माहिती देत नाही,माझे काय बाकडे करायचे ते करा,मी माहिती देणार नाही असे उर्मटपणाचे बोलून मला माहिती पासून आजपर्यंत वंचित ठेवून त्यांनी माहिती दडविलेली आहे.

मालेगाव पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झालेला आहे.मला माहिती दिल्याने भ्रष्टाचार उघड होईल म्हणून संबंधितांनी सदरची माहिती नष्ट करून अपराध केल्याचा मला दाट संशय आहे मालेगाव पाटबंधारे विभागात झालेल्या कामांची मी माहिती अधिकारात अर्ज,प्रथम अपील केले मोफत माहिती देण्याचा आदेश देखील कक्ष नाशिक विभागला आहे. (विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक शासनाच्या नियमानुसार तात्काळ कारवाई होऊन माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक होत वेळोवेळी कार्यालयात जाऊन माहिती अधिकारी व संबंधितांची भेट घेतली,तोंडी विनंत्या केल्या. लेखी पत्र दिले, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने दिलेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेली कामे कायद्यातील तरतुदीप्रमाणे शक्य तितक्या लवकर पार पाडले नाही म्हणून कायद्यातील तरतूदीप्रमाणे ते दोषी आहेत. त्यांनी कायद्याची जाणीवपूर्वक अवहेलना करून मला त्रास दिलेला आहे.

 मी दिलेला माहिती अधिकार अर्ज प्रथम अपील मोफत माहिती देण्याचा आदेशावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असतांना खालील शासकीय कर्मचाऱ्यांचे टेबलावर ७ दिवसापेक्षा जास्त दिवस माझी माहिती प्रकरण प्रलंबित राहिले. त्यामुळे खालील अधिकारी, कर्मचारी उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक आवक लिपीक जलसंपदा विभाग,मालेगाव. अ) मा.रा.श. नियम माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता सो, मालेगाव पाटबंधारे विभाग ब) मा. लिपीक साो. लेखा शाखा क्र. १,२,३ उपअभियंता तलेगांय, कळवण, सटाणा

३.वरील कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले व त्यांच्याशी संपत असलेले शासकीय कर्तव्य हेतुपुरस्कर पार पाडले नाही. जाणीवपूर्वक हेतु पुरस्कर विलंब केलेला आहे. तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्य पालनात कसुर केलेला आहे. त्यामुळे सदरचे कर्मचारी सन २००२ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र.२१ दि.१२ मे २००६ च्या कलम १० चे (१) (२) (३) नुसार दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अशी नम्र विनंती करतो.

४. विषयांकित व संदर्भित विषयाचे सहानुभूतीपूर्वक अवलोपन करून परिच्छेद क्र. ३ मध्ये नमूद शासकीय कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अन्वये शिस्तभंगाची कठोरपणे कारवाई करण्यात यावी. जर माझ्या तक्रार निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर मला न्याय हका संदर्भात लोकशाही मागनि मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र जलसंपदा प्रादेशिक विभाग नाशिक यांचे कार्यालयासमोर लोकशाही मागनि तीव्र स्वरूपाचे उपोषण करावे लागेल.यात मालेगाव पाटबंधारे विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

सदरची माहिती मला आजपर्यंत देण्यात आली नाही. मला माहिती दिल्याने संबंधितांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार व अपहार निकृष्ठ दर्जाची केलेली कामे उघड होतील म्हणूः। मला माहिती दिली जात नाही. सा.बा. उपविभाग मालेगांव, कळवण, सटाणा या उपविभागात झालेल्या कामांची १.ॲन्टी करप्शन ब्युरो,२.धन रोखधाम विभाग-इडी, ३. गुण नियंत्रण विभाग यांचे मार्फत चौकशी करण्यात येऊन संबंधित दोषी अभियंत्यावर व संबंधितावर फौजदारी व बि.एन. एस. कायद्यान्वये गुन्हे दाखल होणे साठी दि. १२/०८/२०२५ रोजी पासून महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण कर्णाच्या व माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल व अभियंता., पाटबंधारे विभाग मालेगांव व संबंधित अधिकारी हे जबाबदार राहतील

निवेदनाच्या प्रति कारवाईस्तव मुख्यमंत्री सचिवालय,नाशिक अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,सिंचनभवन, नाशिक, जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय, नाशिक  कार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी,पाटबंधारे विभाग मालेगांव,उप कार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी,मालेगाव पाटबंधारे विभाग.उप विभागीय अभियंता, मालेगाव पाटबंधारे उपविभाग उप विभागीय अभियंता,सटाणा पाटबंधारे विभाग.
 उप विभागीय अभियंता, कळवण पाटबंधारे विभाग विभागीय आयुक्त, नाशिक, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री,नाशिक.पोलिस आयुक्त नाशिक,
 मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश।नाशिक
 वरीष्ठ पोलिस निरीक्षक नाशिक रोड यांना सादर करण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!