सततच्या पावसामुळे ओझरखेड १०० टक्के तर करंजवण ९४ टक्क्यांवर

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने सुरूवात केली असली तरी काल सकाळपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे सर्वच धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होताना दिसत आहे.
ओझरखेड धरण १०० टक्के भरले तर करंजवण धरण ९४ टक्के भरले आहे.काल सायंकाळपासून सर्वच धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण घरण ९४ टक्के भरले अजून धरणातून कादवा नदीत ७०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

कादवा काठावरील सर्व गावांनी सतर्क राहावे असे आवाहन दिंडोरी पेठचे प्रांत अधिकारी आबासाहेब शिंदे तसेच तहसीलदार मुकेश कांबळे व करंजवण धरण शाखा अभियंता दंडगव्हाण यांनी केले आहे.

तालुक्यात सायंकाळ पर्यंत पावसाचे संततधार कायम असल्यामुळे करंजवण धरणातून टप्याटप्याने विसर्ग करण्यात येणार आहे.

पालखेड धरणातील पाणीसाठा ६२.७९ टक्के असला तरी रात्री पाणी साठ्यात वाढ होणार आहे. रात्री पालखेड धरणातून कादवा नदीत

पाणी सोडण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता सोनवणे यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे मांजरपाडा प्रकल्प (देवसाने) परिसरात तसेच पुणेगाव धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरण ८७.२६ टक्के भरले असून धरणातून जादा पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे यांच पुणेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ओझरखेड धरण आज सकाळी १०० टक्के भरले होते रात्री उशिरा पर्यंत सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. ओझरखेड धरणही १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सकाळ पर्यंत धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडण्यास सुरुवात होईल. त्याप्रमाणे वाघड, तीसगाव हे

धरणे आधीच १०० टक्के भरली आहे. तालुक्यात पावसाची संततधार कायम राहिल्यास रात्री पालखेंड धरणातून मोठ्या विसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.

धरणसाठा (टक्के)

करंजवण धरण-९४%
पुणेगाव धरण ८७%
ओझरखंड धरण ९८%
पालखेड धरण ६३%
वाघाड धरण १००%
तीसगाव धरण १००%
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!