चलो मुंबई- लढाई अंतिम टप्प्यात: शांतता, शिस्त आणि अखंड एकजुटीचे दर्शन होणार
मुंबई(प्रतिनिधी) वंचित मराठा श्रीमंत मराठा असे समीकरण यापूर्वीच्या ५८ मोर्चातून निर्माण झाले असले तरी मनोज जरांगे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान मुंबई याठिकाणी शुक्रवार २९ ऑगस्ट २०२५ पासून उपोषण करणार आहेत.
यापूर्वी झालेल्या ५८ मोर्चे, अंतरावलीतील एक ऐतिहासिक सभा आणि नवी मुंबई पर्यंतची अभूतपूर्व आरक्षण रॅली यामध्ये ज्याप्रकारे मराठा समाजाची शांतता,शिस्त आणि एकजुट बघायला मिळाली अगदी त्याचप्रकारे आत्ताही समाजबांधवांनी अंतरवाली सराटी ते मुंबई या महारॅलीत सहभागी होत असताना शांतता आणि शिस्तीत सहभागी होत असताना सतर्क राहण्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजास दिला आहे.
अंतरवाली सराटी ते मुंबई या महारॅलीचा मार्ग :- २७ ऑगस्ट २०२५- अंतरवाली सराटी- शहागड फाटा-साष्ट पिंपळगाव-आपेगाव(माऊलींचे)-पैठण कमान-घोटण-शेवगाव-मिरी मका-पांढरी पूल-अहिल्यानगर बायपास-नेप्ती चौक-आळेफाटा-ओतूर-बनकर फाटा-शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरी,जुन्नर येथे मुक्काम.
२८ ऑगस्ट २०२५ -शिवाई देवीचे दर्शन-नारायणगाव -राजगुरुनगर-चाकण-तळेगाव-लोणावळा-पनवेल-वाशी-चेंबूर-आझाद मैदान, मुंबई असा मार्ग नियोजित केला असून या उपोषण आंदोलनात जास्तीत जास्त गरजवंत मराठ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
