गरजवंत मराठ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने सामील व्हा.
मुंबई(प्रतिनिधी):-सकल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आत्मीयतेने आणि तळमळीने लढणारे खंबीर नेतृत्व मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या रूपाने मिळाल्याची प्रचितीच आतापर्यंतच्या आरक्षणाच्या लढाईत सर्वांना आलेली आहे. "चलो मुंबई- आता माघार नाहीच" असा नारा देत मराठा मनोज जरांगे पा. यांनी गरजवंत मराठ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना २७ ते २९ ऑगस्ट २०२५ मराठा समाजबांधवांच्या प्रवासात रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी नाष्टा, पिण्याचे पाणी,जेवणाची व्यवस्था,नादुरुस्त वाहनांची मदत करण्यासाठी मराठा सेवक, गावांतील शिखर संस्था तसेच सर्वच समाजबांधव याचे सुयोग्य नियोजन करत असताना सर्वांनी आपापल्या सर्वोत्तम सामाजिक बांधिलकीचे दर्शन यातून दिले आहे.
२९ ऑगस्ट जवळ येत आहे त्यामुळे काही ठराविक लोक, कुठलीही सामाजिक बांधीलकी न जपता केवळ मनोजदादा जरांगे पा. आणि मराठा आरक्षण यावर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वायफळ तसेच द्वेष पसरविण्याचे काम तसेच सकल मराठा समाजाची एकी कशी भंग करता येईल अशी वक्तव्ये करणारांकडे लक्ष न देता या रॅलीतील सहभागी समाजबांधवांची प्रवासात गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे,तसेच मनोज जरांगे यांचाच आदेश अंतिम राहील,असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी केले आहे.
