देवळाच्या मोबाईल चोरास रेल्वे पोलिसांनी नाशिक रोडला केली अटक

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड ऑपरेशन प्रवासी सुरक्षा अंतर्गत नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी यांच्या संयुक्त पथकाने सतर्कता व तत्पर कारवाई करत एक संशयित व्यक्तीस पकडल्यानंतर तो व्यक्ती मोबाईल चोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याबाबतचे वृत्त असे की, आरपीएफ नाशिकरोड येथील आरक्षक मनिषकुमार सिंह, आरक्षक के के.यादव, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक किशोर चौधरी, तसेच जीआरपी नाशिक रोडचे जवान गस्त घालत असताना गाडी क्रमांक १३२०२ डाउन जनता एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशांना ढकलाढकली करणारा एक संशयित व्यक्ती दिसून आला.

त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल आढळून आला.त्याबाबत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.आरपीएफ ठाणे नाशिकरोड येथे त्याला आणण्यात आले.सखोल चौकशीत आरोपीने आपले नाव शुभम दीपक पवार (वय १९, रा. भौर,ता. देवळा, जि.नाशिक) असे सांगितले व मोबाईल चोरीची कबुली दिली.

त्यानुसार जीआरपी नाशिकरोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर आरोपीस पुढील कारवाईसाठी जीआरपी नाशिकरोडकडे सुपूर्द करण्यात आले.प्रवासा दरम्यान सतर्क राहावे व आपल्या मौल्यवान वस्तू, विशेषतःमोबाईल फोन तसेच सोने-चांदीचे दागिने सुरक्षित ठेवावेत,असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!