धुळे सिटीलाईन न्यूज नेटवर्क धुळे जिल्ह्यातील गावातून निघालेला मुलगा किती मोठं स्वप्न पाहू शकतो याचं ज्वलंत उदा-हरण धाडरे गावाने घडवलं आहे. गावातील युवक चेतन सोनवणे याने देशाच्या संपूर्ण सीमेवरून (सुमारे १५,००० किलोमीटर) तिरंगा घेऊन धावण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड मिशनला सुरुवात केली आहे.
हा प्रवास फक्त त्याचा नाही तर संपूर्ण गावाचा अभिमान ठरत आहे. प्रत्येक पाऊल हे माझ्या गावासाठी लहानशा आहे,माझं नाव नाही तर धाडरे गावाचं देशासाठी नाव देशभर पोहोचावं हा खरा उद्देश आहे,असं चेतन सोनवणे आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाले.आतापर्यंत फक्त नकाशावर असलेलं धाडरे गाव आता राष्ट्रीय पातळीवर ओळखलं जाणार आहे. गावातील लोकांनी चेतनला भरभरून शुभेच्छा दिल्या असून, धाडरे गावातून निघालेला मुलगा भारताचा अभिमान ठरेल, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली. देशासाठी प्रेरणादायी
मिशन-सीमेवरून धावत जाण्याचं धाडस हे देशभक्तीची खरी साक्ष आहे. गा-वातील तरुणाने घेतलेला हा उपक्रम इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिरंगा घेऊन केलेला हा प्रवास केवळ क्रीडा उपक्रम नसून, देशाविषयी असलेली निष्ठा आणि गावाबद्दलचा अभिमान प्रकट करतो. या मिशनमुळे धाडरे गावाचं नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार आहे. भविष्यात सांगता येईल की धाडरे गावातून निघा-लेला चेतन ज्याने देशासाठी जगभरात अभिमान निर्माण केला.
