श्रीरामपूर दिपक कदम नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील रोझलँड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपल्या भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक शिंदे, फटांगरे संस्थेचे अध्यक्ष श्री.अंबाडे , शिक्षिका अंबाडे, संचालक अजित सर निकिता मॅडम, कुटे सर, मुख्याध्यापक श्री येवले उपमुख्याध्यापक श्री.बारगळ, प्राथमिक शाळेच्या मुख्य मनिषा यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाळेचे व्यवस्थापक व शिक्षक यांच्या वतीने यथोचित असा सत्कार केला. पाहुण्यांना स्कूल बॅंड व मार्च परेड द्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाबद्दल विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. या स्वातंत्र्यदिनी, आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याबद्दल कृतज्ञ होण्यासाठी आणि ज्यांनी हे शक्य केले त्या महान आत्म्यांचे स्मरण करूया.चला जबाबदार नागरिक होण्याचे,आपल्या अभ्यासात कठोर परिश्रम घेण्याचे, आपल्या ज्येष्ठांचा आदर करण्याचे आणि एकमेकांशी दयाळूपणे वागण्याचे वचन देऊ या असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज आपण जसा तिरंगा ध्वज फडकावत आहोत, तसेच एकता,प्रेम आणि प्रगतीचा झेंडाही फडकावूया.एकत्रितपणे, आपण भारताला जागतिक पटलावर आणखी चमकवू शकतो.नर्सरी, एलकेजी, युकेजी, पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषण, गायन, डान्स, स्किट, पिरॅमिड, मार्च पास्ट, कवायत, दहीहंडी यांसारखे फार सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम वरतून पावसाच्या सरी सुरू असताना देखील या ठिकाणी केले व वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बांगर व राजवीर परदेशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्हाइस प्रिन्सिपल बारगळ सर यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थापनच्या वतीने खाऊ वाटण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी फार परिश्रम घेतले.
