-सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
संगमनेर नितीनचंद्र भालेराव एकोणिसाव्या शतकातील स्त्रिया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या.त्या काळात आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांनी मोठ्या धाडसाने स्टेजवर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर सर्वत्र लावण्या सादर केल्या.लावणीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांची १५५ वी जयंती १२ ऑगस्ट रोजी कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर, राजश्री शाहू विचार मंच हिवरगाव पावसा ता. संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात येणार आहे.जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभेचे आयोजन हिवरगाव पावसा येथे करण्यात आले आहे.
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रा.भगवान अहिरे यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व अभिवादन सभेचे आयोजन राजकीय,कला,सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.